पाकिस्तानचे खोटे पुन्हा उघड झाले
राफेलच्या महिला चालकाची राष्ट्रपतींसमवेत भेट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान सशस्त्र संघर्षाच्या काळात पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा आता उघड झाला आहे. या संघर्षात भारताच्या राफेल विमानाच्या महिला वैमानिक शिवांगी सिंग यांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी बतावणी पाकिस्तानने केली होती. तथापि, स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग या भारतातच सुखरुप असून त्यांनी बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह फोटोसेशन केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
शिवांगी सिंग यांनी भारताच्या ‘सिंदूर अभियाना’त भाग घेतला होता. भारताच्या वायुदल तुकडीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त केले होते. या तुकडीत शिवांगी सिंग यांचे विमानही समाविष्ट होते. पाकिस्तानने भारताची अनेक विमाने पडल्याचा दावा केला होता. तसेच शिवांगी सिंग आपल्या ताब्यात असल्याची बतावणीही केली होती. भारताने पाकिस्तानचे हे सर्व दावे फेटाळले होते. आता पाकिस्तानचा खोटारडेपणा प्रत्यक्ष पुराव्यानिशी उघड झाला आहे.
प्रथम महिला विमानचालक
शिवांगी सिंग या भारताच्या प्रथम आणि एकमेव युद्धविमान चालक आणि स्क्वॉड्रन लीडर आहेत. 29 वर्षांच्या शिवांगी सिंग या वाराणसीच्या असून त्यांनी 2017 मध्ये भारतीय वायुदलात प्रवेश केला आहे. प्रथम त्या मिग-21 बायसन या युद्धविमानाच्या चालिका होत्या. 2020 मध्ये त्या राफेल विमानाच्या चालिका बनल्या. जगातील एका सर्वात जुन्या विमानाच्या चालिका, ते जगातील एका अत्याधुनिक विमानाच्या चालिका हा त्यांचा प्रवास ऐतिहासिक मानला जातो. नुकताच त्यांचा एअर मार्शल तेजबीर सिंग यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील तांबारम येथील विमान प्रशिक्षण प्रशाला कार्यक्रमात सत्कार करण्यात आला होता.
पाकिस्तानकडून बनावट व्हिडीओ
भारताची विमाने पाडल्याचे काही बनावट व्हिडीओ पाकिस्तानकडून ‘सिंदूर अभियाना’च्या काळात प्रसारित करण्यात आले होते. भारताची एक महिला वैमानिक बेपत्ता आहे, असे भारताचे एअर मार्शल म्हणत आहेत, असे दर्शविणारा एक बनावट व्हिडीओही पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. या बेपत्ता महिला वैमानिक शिवांगी सिंग याच आहेत आणि त्या आमच्या ताब्यात आहेत, अशी हास्यास्पद दर्पोक्ती पाकिस्तानने त्यावेळी केली होती. तथापि, हे सर्व व्हिडीओ बनावट आहेत, हे त्यांच्या परीक्षणानंतर त्याचवेळी स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी शिवांगी सिंग यांना ताब्यात घेतल्याचे पाकिस्तानचे म्हणणे अनेक वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाले होते. मात्र, शिवांगी सिंग यांनी भारताच्या राष्ट्रपतींसमवेत विमान उ•ाण केल्याने पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात गेले आहेत. तसेच ‘सिंदूर अभियाना’तील भारताचे यशही ठळकपणे उघड झाले आहे.
शिवांगी सिंग ही एकमेव आहे.
ड पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा खोटा दावा केलेल्या शिवांगी सिंग भारतातच
ड स्क्वाड्रन लीडर शिवांगी सिंग या भारताच्या प्रथम महिला युद्धविमानचालिका
ड राफेल विमानातून उ•ाण आणि प्रवास हा अनुभव अविस्मररणीय : राष्ट्रपती
Comments are closed.