घामाचा वास ओढणी लपवली, बायको अन् प्रियकराने सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांना संपवलं, नेमकं का


पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (Pimpri Nakul Bhoir case) खुनात पत्नी चैतालीसह तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून काल (बुधवारी, ता 29) न्यायालयासमोर हजर करण्यात (Pimpri Nakul Bhoir case) आलं. न्यायालयाने चैताली आणि दीपक या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून केल्याची माहिती पत्नी चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून दिली होती. चिंचवड येथील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी चैतालीला अटक (Pimpri Nakul Bhoir case) केली होती. मात्र, पोलिसांना या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावं, अशी शंका होती. त्यानुसार पोलिसांनी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र, यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सर्व सत्य समोर आलं आहे.(Pimpri Nakul Bhoir case)

Pimpri Nakul Bhoir case : पोलिसांना ओढणी लपवून दुसरीच दाखवण्याचा प्रकार

चैतालीने आपणच नकुलचा गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र तपासामध्ये दोघांनी खून केल्याचं समोर आलं. ज्या ओढणीने नकुलचा गळा आवळला, ती ओढणी सिद्धार्थ जाळून टाकणार होता. कारण तिला नकुलच्या घामाचा वास लागला होता. त्यामुळे चैतालीने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला, ती जप्त करण्यासाठी चैतालीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पिंपरी नकुल भोईर प्रकरण : प्रेम संबंध नकुलेशी वाड

सिद्धार्थ-चैतालीच्या प्रेमसंबंधावरून नकुलशी वाद होत होते. प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने दोघांनी नकुलला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहिती नकुल यांना मिळाली होती. त्यावरून भांडणे झाली. यावेळी नकुलने तिला मारहाण केली. तिला मारहाण झाल्याने प्रियकर सिद्धार्थचा राग अनावर झाला. दोघांनी संगनमताने ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केला.

पिंपरी नकुल भोईर प्रकरण : नुमक नियुक्ती?

पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा काही दिवसांपूर्वी गळा आवळून खून करण्यात आला. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हे केल्याचं चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी अत्यंत वेगात तपासचक्रे फिरवून सत्य समोर आणलं असून, याप्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती, मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. चैतालीने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ दीपक पवार यालाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होते. याच गोष्टींचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला. चिंचवड पोलिसांच्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आलं असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.