Parenting Tips: अभ्यास करताना मुलांचे लक्ष विचलित होते? या टिप्सने होईल मदत
आजकाल घरात टीव्ही, मोबाईल असल्याने मुलं अभ्यास करायला टाळाटाळ करतात. त्यातच अभ्यासाला बसल्यावर मुलांना लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते. मग अशावेळी नेमकं काय करावं? मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा हे पालकांना समजत नाही. यासाठी काही टिप्स महत्त्वाच्या ठरतात. या टिप्सचा वापर करून पालक आपल्या मुलांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करू शकतात. ( How to make children focus on study )
1 मुलांना अभ्यासाला बसवताना घरातील वातावरण शांत असणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात टीव्ही किंवा इतर आवाज असेल तर मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे मुलांजवळ मोबाईल ठेवू नका आणि घरात आवाज होणार नाही याची खात्री करा. तसेच मुलांना स्टडी टेबलवर अभ्यासाला बसवा जेणेकरून त्यांना कम्फर्टेबल वाटेल.
2 मुलांच्या अभ्यासाचे रूटीन सेट करा. रूटीन सेट केल्यावर मुलांना अभ्यासाची सवय लागते. दररोज अभ्यासाची एकच वेळ पाळल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
3 मुलांसाठी अभ्यासाचे ध्येय निश्चित करा. म्हणजे जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात तेव्हाच त्यांना आज किती अभ्यास करायचा हे सांगूनच बसवा. म्हणजेच मुलांची मानसिक तयारी असते आणि ते अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतात. ठराविक अभ्यास पूर्ण केल्यावरच मुलांना अभ्यासावरून उठवा.
4 बहुतांश पालक हे आपल्या मुलांना बराच वेळ अभ्यासाला बसवतात. पण असे करणे चुकीचं आहे. दीर्घ काळ एखाद्या गोष्टीत लक्ष केंद्रित करणं कठीण जाते. त्यामुळे मुलांना अभ्यासाला बसवल्यावर ब्रेक घेऊ द्या. यादरम्यान, त्यांना पाणी पिण्याची सवय लावा. 30-45 मिनिटांनी 5-10 मिनिटांचा ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.
Comments are closed.