IND vs SA सामन्याची वेळ बदलली! आधी टी-ब्रेक, मग लंच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर धमाल उडवल्यानंतर आता टीम इंडिया (Team india) स्वतःच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. या मालिकेची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होईल. त्यानंतर 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. पहिली कसोटी 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. या सामन्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या कसोटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या वेळेत थोडासा बदल करण्यात आला आहे. सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि पहिला सत्र दोन तास चालेल.
पहिल्या सत्रानंतर नेहमीप्रमाणे लंच न घेता टी-ब्रेक घेतला जाईल, जो 20 मिनिटांचा असेल. त्यानंतर दुसरं सत्र 11.20 वाजता सुरू होईल आणि तो दोन तास चालेल. दुसऱ्या सत्रानंतर लंच ब्रेक असेल, जो 40 मिनिटांचा असेल. तिसरे सत्र दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि दिवसाचा खेळ संध्याकाळी 4 वाजता संपेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्स येथे होईल, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.

कसोटीनंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिके सोबत खेळणार आहे.
पहिला वनडे 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल, दुसरा सामना रायपूरमध्ये 3 डिसेंबरला, आणि तिसरा व शेवटचा वनडे 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

यानंतर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल आणि तिचा शेवटचा सामना 19 डिसेंबरला खेळला जाईल.

Comments are closed.