INDW vs AUSW: फायनलमध्ये जाण्यासाठी भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य! टीम इंडिया रचणार इतिहास?
महिला विश्वचषक 2025 चा दुसरा उपांत्य सामना आज नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट गमावून 338 धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर 339 धावांचे लक्ष्य आहे.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला इतिहास रचावा लागेल. टीम इंडियाने विश्वचषकात कधीही इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारुंची सुरुवात चांगली झाली नाही, परंतु फोबी लिचफिल्डने 119, एलिस पेरीने 77 आणि अॅशले गार्डनरने ६३ धावा करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
भारतासाठी श्री चरणी आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात भारताने खूपच खराब क्षेत्ररक्षण केले.
या उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफिल्ड, ॲलिसा हिली (टेनर आणि कस्टोडियन), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनो, ॲलाना किंग, किम गर्थ, मेगन शट.
भारत: शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), राधा यादव, क्रांती गवाड, श्री चरनी, रेणुका सिंह ठाकूर.
Comments are closed.