जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ

नॅशनल कॉन्फरन्स-भाजप आमदारांमध्ये संघर्ष

मंडळ/श्रीनगर

जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी विरोधी पक्ष भाजप आमदारांची नॅशनल कॉन्फरन्स आमदारांशी जोरदार हमरीतुमरी झाली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप नेत्यांनी उभे राहूत प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्याची मागणी केली. त्यांनी जम्मूच्या पूरग्रस्त स्थितीवर अर्धा तास चर्चा करण्याची मागणी केली. तथापि, सभापती अब्दुल रहीम राथेर यांनी भाजप आमदारांना प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याची विनंती केल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला.

भाजप सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला नकार दिला. सभागृहात पूरग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा झालीच पाहिजे, या आपल्या मागणीवर ते ठाम राहिले. याचदरम्यान गोंधळ वाढत असताना, किश्तवाड येथील भाजप आमदार शगुन परिहार यांनी सभागृहाच्या वेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान महिला वॉच आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्यानंतर मार्शलनी आरएस पठानिया आणि सुरिंदर कुमार या दोन भाजप आमदारांना बाहेर काढले. अखेर भाजप आमदार संपूर्ण प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात राहिले, परंतु नंतर त्यांनी बहिष्कार टाकला.

बुधवारही गोंधळातच

उमर सरकार सध्या चालू अधिवेशनात भाडेपट्टा सुधारणा, पंचायती राज, कामगार कल्याण आणि सहकारी संस्थांशी संबंधित चार महत्त्वाची विधेयके मंजूर करण्याची तयारी करत आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू असताना बुधवारी राज्य निवडणूक आयुक्तांची वयोमर्यादा 65 वरून 70 वर्षे करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले तेव्हा सभागृहात गोंधळ उडाला होता. गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षाच्या सदस्यांमुळे सभागृह कामकाजाचा बराच वेळ वाया गेला आहे.

Comments are closed.