वर्क ऑर्डर 12 जूनची अन् कामाचे आदेश 1 जूनचे; पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा उरफाटा कारभार, अधिकार्यांच्या डोळेझाकून सह्या !

पुणे बाजार समितीतील वाहन प्रवेश शुल्क वसुली ठेक्यातील गैरव्यवहारांनी हद्द ओलांडली आहे. मे. मोरया एंटरप्रायजेस या ठेकेदारास १२ जून रोजी अकरा कर्मचार्यांचे मनुष्यबळ पुरवण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली, पण गंमत म्हणजे त्याच वर्क ऑर्डरमध्ये काम १ जूनपासून सुरू करण्याचे आदेश नमूद आहेत. दुकानदारी करताना संचालक मंडळासह अधिकार्यांचेही भान हरपल्याचे हे चांगले उदाहारण आहे. त्यामुळे संचालक मंडळाचा संपूर्ण कारभारात गोलमाल असल्याचे शिक्कामोर्तब होत आहे.
पुणे बाजार समिती संचालक मंडळाने वाहन प्रवेश शुल्क वसुली ठेक्यात सर्वकाही मनामानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्क ऑर्डर निवदा न राबवता मे मोरया एंन्टरप्रायजेसला मनमानी पद्धतीने काम दिले आहे. संचालक मंडळ येण्यापूर्वी बाजार समितीने हा ठेका चालवण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवली होती. यामध्ये सिद्धिविनायक इंटरप्राईजेस यांनी सर्वाधिक बोली लावून हे टेंडर वार्षिक ५६ लाख रुपयांना (जीएसटी, आयकर आदी कारांसह) मिळाले. या टेंडरला दोन वर्ष मुदत होती. या दोन वर्षात बाजार समितीला कोणताही खर्च न करता जीएसटी, आयकर आदी कारांसह सुमारे १ कोटी ३४ लाख रुपये मिळाले. संचालक मंडळाने जवळच्या लोकांसाठी नियम धाब्यावर बसवून बाजार समितीचे अडीच वर्षात दीड कोटींचे नुकसान केले. यातून फायदा शून्य रुपये झाला. त्यामुळे संचालक मंडळ आणि यातील सामील अधिकारी नक्कीच अडणीत सापडण्याची शक्यता आहे.
नवनवीन विभाग प्रमुखही घोटाळ्यात सामील !
गुळ भुसार विभागाचे माजी प्रमुख प्रशांत गोते यांच्या काळात या ठेक्यातून ५१ लाखांचे उत्पन्न झाले. त्यांच्यानंतर आलेल्या बाळासाहेब कोंडे आणि सध्याचे विभाग प्रमुख के. ऐन. घुले यांच्या काळात उत्पन्न कमी झाले. घुले यांच्याकडे वाहन प्रवेश शुल्काची संपूर्ण जबाबदारी असूनही त्यांनी हजेरी तपासणी, वसुली नोंदी आणि ठेकेदाराचे कामकाज तपासले नाही. उलट ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप त्यांच्यावर होवू लागला आहे. यापूर्वीचे विभाग प्रमुखदेखील ठेकेदाराच्या इशार्यावर नाचत होते. आता घुलेही ठेकेदारांच्या आशीर्वादाने काम करत आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. याविषयावर घुले यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
 
			 
											
Comments are closed.