IND vs AUS: मेलबर्नमध्ये टीम इंडियाच्या पराभवाला हे 6 खेळाडू जबाबदार? जाणून घ्या सविस्तर

मेलबर्नमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपल्या खराब कामगिरीने देशाची मान कुठेतरी खाली घालवली (Melbern Cricket Ground IND vs AUS). टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी कंगारू वेगवान गोलंदाजांसमोर अगदी ताशाच्या पत्त्यांसारखी कोसळली. एकामागून एक फलंदाज बाद होत राहिले आणि संपूर्ण टीम फक्त 125 धावांत गारद झाली. ऑस्ट्रेलियाने हे 126 धावांचे लक्ष्य केवळ 6 विकेट गमावून सहज गाठले. चला जाणून घेऊया, मेलबर्नमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे ते ‘सहा खेळाडू’ कोण ठरले.

कॅनबऱ्यात चांगल्या लयीत दिसलेला शुभमन गिलकडून (Shubman gill) मेलबर्नमध्येही तडाखेबाज खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने निराशा केली. तो फक्त 5 धावा करून बाद झाला. संजू सॅमसनला (Sanju Samson) टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली, पण त्याने ती अजिबात साधता आली नाही. तिलक वर्मा (Tilak Verma) शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (Shivam Dube) काही खास कमाल दाखवू शकला नाही, तर कर्णधार सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) फक्त 1 धाव करून बाद झाला.

Comments are closed.