संगतीचा परिणाम ते शेतकऱ्यांची खिल्ली उडवणार वक्तव्य, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा
रोहित पवार: शेतकरी (Farmers) वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. केंद्र सरकार सोयाबीन आयात करत आहे, कापसावरील आयात शुल्क हटवले आहे, कांद्याची निर्यात बंदी केली आहे, कोणत्याच पिकाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान लाखोंचे पण तुम्ही हातावर टेकवले अवघे 8000? अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा कर्ज कसे फेडायचे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती
निवडणुका होत्या म्हणून आश्वासन दिले, शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावावी, वेळच्या वेळी कर्ज फेडावे यासंदर्भात आपण केलेलं वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणार आहे. संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
मुळात या सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीही आस्था नाही
मुळात या सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीही आस्था नाही, शेतकऱ्यांना दिलासा देता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. आता मीठ चोळलं तर दिलगिरी व्यक्त कराल, ही अपेक्षा असे रोहित पवार म्हणाले. महत्वाचं म्हणजे हे सगळं बघितलं तर काल सरकारने दिलेलं आश्वासन म्हणजे बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा post dated चेक आहे , असंच म्हणावं लागेल असे रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या वक्त्व्यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
आणखी वाचा
Comments are closed.