इलमपार्थी 90 वा ग्रॅण्डमास्टर

हिंदुस्थानच्या बुद्धिबळ विश्वात आणखी एक तेजस्वी अध्याय लिहिला गेला आहे. चेन्नईचा 16 वर्षीय बुद्धिबळपटू ए. आर. इलमपार्थीने बोस्निया आणि हर्झेगोविनातील जीएम4 बिजेल्जिना बुद्धिबळ महोत्सवात अंतिम नॉर्म मिळवत हिंदुस्थानचा 90 वा ग्रॅण्डमास्टर बनण्याचा मान पटकावला आहे. या तरुण खेळाडूने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने आणि अदम्य चिकाटीने हे यश मिळवले.

डिसेंबर 2023 मध्ये व्हिएतनाममधील हनोई टुर्नामेंटमध्ये त्याने पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म मिळवला होता. त्यानंतर 2024 मध्ये सिंगापूर इंटरनॅशनल ओपनमध्ये दुसरा नॉर्म प्राप्त केला. यानंतर रिल्टन कप (2024-25) स्पर्धेदरम्यान त्याने 2500 ईएलो रेटिंगचा टप्पा पार करत निर्णायक पाऊल उचलले. अखेर बोस्नियातील अंतिम नॉर्म मिळवत त्याने ग्रॅण्डमास्टर पदवी निश्चित केली आणि हिंदुस्थानच्या नावावर आणखी एक गौरवाचा तुरा खोवला.

Comments are closed.