कॅलिब्रेशन फ्लाइट नोएडा येथे उतरले
‘डीजीसीए’च्या देखरेखीखाली यशस्वी चाचणी
वृत्तसंस्था/ नोएडा
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (जेवर विमानतळ) शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी पहिले कॅलिब्रेशन फ्लाईट यशस्वीरित्या उतरले. डीजीसीएच्या कडक देखरेखीखाली यासंबंधीची चाचणी पूर्ण करण्यात आली. गुरुवारी खराब हवामानामुळे उ•ाण रद्द करावे लागले होते. तथापि, शुक्रवारी स्वच्छ हवामानामुळे कॅलिब्रेशन फ्लाइट यशस्वीरित्या उतरल्याची माहिती देण्यात आली. या चाचणीसह आता येथे व्यावसायिक उ•ाणे लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून येथे पहिले कॅलिब्रेशन फ्लाइट यशस्वीरित्या उतरवण्यात आले. या चाचणीमुळे उत्तर भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ बनण्यासाठी नियोजित असलेले जेवर विमानतळ पूर्ण ऑपरेशनच्या दिशेने एक पाऊल पुढे आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यकालीन प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
कॅलिब्रेशन फ्लाइट म्हणजे काय?
कॅलिब्रेशन फ्लाइट ही एक अत्यंत तांत्रिक आणि अनिवार्य प्रक्रिया आहे. एअरोड्रोम परवाना जारी करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या चाचणीचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या सर्व नेव्हिगेशन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार कार्यरत आहेत याची खात्री करणे हा होता. विमानाच्या सुरक्षित लँडिंग आणि टेकऑफसाठी या प्रणाली महत्त्वाच्या आहेत.
नोएडा विमानतळाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून सर्व सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारी पूर्ण झाली आहे. अलिकडेच, प्रवाशांच्या प्रवेश, चेक-इन, सुरक्षा तपासणी आणि सामान हाताळणीसह संपूर्ण प्रणालीच्या टर्मिनल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. या यशस्वी चाचण्यांनंतर, आता कॅलिब्रेशन फ्लाइट यशस्वीरित्या उतरली आहे. साहजिकच आता विमानतळाला एअर ऑपरेशन क्लिअरन्स (एओसी) मिळण्यास सज्ज असल्याचे दिसून येते. आता नोएडा हे उत्तर भारतातील सर्वात मोठे हवाई केंद्र बनणार असून देशातील अनेक प्रमुख शहरांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.
Comments are closed.