Winter Travel : या ठिकाणी घेता येईल गुलाबी थंडीचा आनंद, आजच करा बुकिंग

हिवाळ्यात थंडगार वातावरणात फिरायला जायची मज्जा काही वेगळीच असते. ऑक्टोबरच्या हिटनंतर सर्वचजण गुलाबी थंडीची वाट पाहतात. कारण थंडीत शेकोटीजवळ बसून गरमा गरम कॉफी, चहा आणि सोबत आपली माणसे म्हणजे सुख. त्यामुळे अनेकजण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कुटूंबासोबत, मित्र-मैत्रिणींसह फिरण्याचा प्लॅन आखतात. आज आपण जाणून घेऊयात गुलाबी थंडीचा आनंद द्विगुणित करणारी बजेटमध्ये बसणारी ठिकाणे,

मनाली –

मनाली निसर्गरम्य वातावरण आणि गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध आहे. बरेचसे पर्यटक येथे दिवाळीनंतर अर्थात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येथे जातात. येथे तुम्हाला स्कीइंग, स्नोबार्डिंगसाठी आनंद घेता येईल.

औली –

उत्तराखंडचे काश्मीर अशी औलीची ओळख आहे. जानेवारीमध्ये येथे बर्फवृष्टी होते. तुम्ही जानेवारीच्या आसपास गुलाबी थंडीची मज्जा घेण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण उत्तम आहे.

हेही वाचा – World’s Shortest Flight: जगातील सर्वात लहान 53 सेकंदाचा विमान प्रवास

राजस्थान –

हिवाळ्यात फिरण्यासाठी राजस्थान उत्तम ठिकाण आहे. इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळेल. 5 ते 6 दिवस राजस्थान फिरण्यासाठी पुरेसे आहेत.

वर्कला –

दक्षिण भारतातील वर्कला येथे हिवाळ्यात भेट देण्याचा नक्की विचार करावा. केरळच्या तिरुवअनंतपुरम जिल्ह्यात स्थित हे ठिकाण आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

गुलमर्ग –

हिमवर्षाव पाहायची इच्छा असेल तर गुलमर्ग ठिकाण उत्तम असेल. येथे तुम्ही स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि गोंडोला राईड करता येईल.

कुफरी –

शिमला येथून जवळच असणारं कुफरी थंडीची मज्जा घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला येथे बर्फवृष्टी पाहायला मिळते.

महाबळेश्वर –

महाबळेश्वर बजेटमध्ये बसणारे ठिकाण आहे. हिरवगार वातावरण, दऱ्या यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

हेही वाचा – Google Gemini वर बनवा मोफत AI Halloween फोटो; सोप्या स्टेप्स आणि भन्नाट प्रॉम्प्टसह गाईड

Comments are closed.