महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ‘अवैध शस्त्र तस्करी’ प्रकरणात पंजाबमध्ये अटक!
पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) विभागाने पपला गुज्जर गुंडागर्दीच्या जाळ्यात अडकलेल्या चार संशयितांना पकडले. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेखचा समावेश आहे. (International-level wrestler Sikandar Sheikh is included). ही कारवाई मोहालीतील विमानतळ चौकात 24 ऑक्टोबरला झाली. ज्यात आरोपींकडून 1.99 लाख रुपयांची रोख रक्कम, एक .45बोर पिस्तूल, चार .32 बोर पिस्तूल, अनेक काडतुसे आणि दोन स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही वाहने हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा झाली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेतले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झाले होते. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापले होते. त्यानंतर, पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024 ची मानाची गदा पटकावली होती. त्यापूर्वीच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचे त्याने म्हटले होते. पंढरपूरमध्ये बोलताना सिकंदर शेखने आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवावर उत्तर दिले. मात्र, आता अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने सर्वांनाच खूप मोठ्या धक्का बसला आहे.
सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आले आहे. सिकंदरच्या बाजुने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत.
Comments are closed.