रुपाली चाकणकरांबद्दल अजित पवार नाराज, पण सुनील तटकरेंना त्यांना पदावर ठेवायचंय: सुषमा अंधारे


फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची बातमी. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती (एसआयटी) नेमल्याचे वृत्त खोटे आहे. राज्य सरकारने याप्रकरणात केवळ देरखेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांची नेमणूक केली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले. सुषमा अंधारे सोमवारी फलटण पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची माहिती घेणार आहेत. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Satara News)

मला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आकस नाही. ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. पण त्याऐवजी त्यांनी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी. मी तुमची बहीण आहे, तुमच्या गावची पाहुणी आहे. तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावेळी सुषमा अंधारे यांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचाही दावा फेटाळून लावला. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेमणुकीचे पत्र वाचा. त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, याप्रकरणात तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, असे म्हटले आहे. काल भाजपचा एक बोलघेवडा नेता मला म्हणत होता, अहो तुम्हाला कळत नाही. पण माझ्याकडे सरकारने केलेल्या नियुक्तीचे पत्र आहे. खरंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत. हे आत्महत्या प्रकरणात राजकारणापासून प्रभावमुक्त होऊ शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली नाही. माझी भूमिका मी आधी मांडली आहे. जे पत्र लिहले आहे ते सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. पीडितेच्या नातेवाईक यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. याप्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी. जेणेकरुन याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Rupali Chakankar news: रुपाली चाकणकरांवर मला बोलायचं नाही: सुषमा अंधारे

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनीही फारकत घेतली होती. सुषमा अंधारे यांनी याबाबत मोजक्या शब्दांत भाष्य केले. रुपाली चाकणकर यांच्यावर आम्हाला बोलायचे नाही. अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण सुनील तटकरे यांना चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवायचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Ranjitsingh Naik Nimbalkar: फलटण डॉक्टर तरुणी मृत्यूप्रकरणावर प्रत्युत्तर देण्यासाठी आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांची सभा

फलटणधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण नगरीमध्ये सभा होत आहे . आज संध्याकाळी सहा वाजता फलटणी मधील ऐतिहासिक अशा गजानन चौकात ही सभा पार पडणार आहे. या सभेत रणजीतसिंह नाईक निंबाळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Chhatrapati Sambhajinagar news: संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून मार्ड संघटना आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मार्ड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. डॉ संपदा मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. एकच वेळी वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.