हरमनप्रीत कौरला मिळाली मोठी ऑफर; एका मोठ्या कंपनीची झाली ब्रँड अॅम्बेसेडर

टीम इंडियाच्या रणरागिणींसाठी 2025 हे वर्ष खूप महत्त्वाच ठरलं. गेली कित्येक वर्ष जेतेपदाची प्रतीक्षा करत असलेल्या टीम इंडियाने अखेर बाजी मारली. हिंदुस्थानी महिला संघाने आपली 52 वर्षांची जगज्जेतेपदाची प्रतीक्षा संपवली आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळलेल्य़ा या खेळाने इतिहासाच्या पानांवर आपलं नाव कोरलं. हिंदुस्थानच्या या रणरागिणींची संपूर्ण जगभरातून वाह वाह होत असताना आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीने कर्णधार हरमनप्रीत कौरला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
रिअल इस्टेट कंपनी ओमॅक्स लिमिटेडने यासंदर्भातील एक निवेदन जारी केले आहे. हरमनप्रित कौरची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ओमॅक्ससोबत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करताना आणि तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि समुदायांना बळकटी देण्यासाठी काम करणाऱ्या कंपनीशी जोडल्याबद्दल मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीत कौरने दिली आहे. ओमॅक्स ही देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानीने मारली बाजी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे नवे जगज्जेते होण्याचा इतिहास रचला. 58 धावांची जबरदस्त खेळी करणाऱ्या दिप्तीने 39 धावांत 5 विकेट घेत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दीप्ती शर्मा हिने 5 विकेट्स, तर शेफाली वर्मा हिने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली हिला प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती हिला प्लेअर ऑफ द सिरीजने गौरविण्यात आले.
INDW vs SAW Final – हिंदुस्थान विश्वविजेता! महिला संघाने कोरले विश्वचषकावर नाव
			
											
Comments are closed.