गतिमंद मुलांना हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण, 6 निलंबित, पण अद्याप आरोपींना अटक नाही!
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कूकरच्या झाकणाने मारहाण (Assault) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी असे मिळून 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी मारहाण करणारे दीपक गोविंद इंगळे आणि प्रदीप वामन देहाडे दोघांना निलंबित करण्यात आले होते. आता एकूण 6 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मारहाण होत असताना तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते. त्यांनी या घटनेची ना संस्थाचालकांकडे, ना समाज कल्याण विभागाकडे वाच्यता केली.
हा प्रकार दाबून ठेवण्यास तेही जबाबदार आहेत. म्हणून मारहाण करणारे आणि तेथे उपस्थित असलेल्या सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. मंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दिव्यांग आयुक्तालयाने (Disabilities Commissioner) पंधरा दिवसांत अहवाल मागवला आहे. दोषींवर आणि संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. असे असले तरी या संतापपालक प्रकारातील आरोपींनाही अद्याप अटक करण्यात आली शिराल्याची माहिती आहे. त्यामुळे या आरोपींनाही नेमकी कधी अटक होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : 6 निलंबित, पण अद्याप आरोपींना अटक नाही! कोण आहेत आरोपी?
दरम्यान या संतापपालक आणि अमानवी वागणुकीत प्रामुख्याने दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यात दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे यांचा समावेश आहे. दीपक इंगळे हा गेल्या 10 वर्षांपासून या विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तर, प्रदीप देहाडे हा देखील दहा वर्षांपासून या संस्थेत काळजीवाहक म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Atul Save : गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी
दरम्यान, हा संतापपालक प्रकार घडला तो राज्यातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सावे म्हणाले, “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या. जर या संस्थाच छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे. त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झाली पाहिजेत …नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल… कायमचं!” या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संस्थेवरील देखरेख आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.