अमेरिकेत 10 लाख नोकऱ्या गेल्या! मालमत्ता क्षेत्रात मंदी

अमेरिकेसारख्या प्रगत देशात आता नोकऱ्या आणि आर्थिक मंदीची चिंता गडद झाली आहे. एकेकाळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असायच्या. मात्र आता नोकऱ्या कमी आणि नोकरकपात जास्त असे चित्र आहे. खासगी आणि सरकारी क्षेत्रातील लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. चॅलेंजर, ग्रे अँड क्रिसमसच्या एका अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान अमेरिकेतील कंपन्यांनी सुमारे 9.5 लाख नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केलेली आहे.

अर्थव्यवस्थेची काही क्षेत्रे मंदीच्या सावटाखाली आहेत. मालमत्ता क्षेत्र वास्तविकपणे मंदीच्या फेऱ्यात आहे, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी सांगितले. एकीकडे फेडरल रिझर्व्ह बँक उच्च व्याजदर महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे रोजगार आणि हाऊसिंग मार्केटला कमकुवत करत आहे. अमेरिकेत गेल्या वर्षीपर्यंत नव्या नोकऱ्या मिळत नव्हत्या, पण नोकरीवरून लोकांना काढले जात नव्हते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.

Comments are closed.