रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला


रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सुषमा अंधारे : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Death) प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उप नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान त्यांनी दिले. मला गोळी घातली तरी चाललं असतं, पण किती बदनामी करता? असा सवालही त्यांनी विचारला. आता यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, धनंजय मुडे म्हणाले कोणत्या खासदाराच्या PA चा कॉल आलेला त्याचा तपास करावा. रणजित निंबाळकर यांनी काल माझी जाहीर माफी मागितली. ते माझ्यावर 50 कोटीचा दावा टाकणार होते. हा विषय क्लिष्ट चाकणकर यांनी केला. अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर करतात. रणजित दादा मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं. मला पोलिसांना प्रश्न विचारायचं होतं. रणजित नाईक निंबाळकर स्वतः उत्तर का देतात? ते स्वतःला आरोपी का समजतात? तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही चांगली गोष्ट आहे. ते खर्च करायला तयार आहेत. मग ती 6 माणस आहेत, त्यांना आरोपी करायला का तयार नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sushma Andhare on Ranjitsinh Naik Nimbalkar: ते आर. आर.  म्हणजे वृक्षराज निंबाळकर

बापू ननावरेचा सुसाईड विडिओ तयार केला तेव्हा तुम्ही म्हणाला शहरात 34 नाईक निंबाळकर आहेत. तुमच्या गावात सगळे निंबाळकर आहेत. रणजित निंबाळकर नावाचे 34 लोक असू शकतात तर आर. आर. निंबाळकर किती असू शकतात? रत्नशिव निबाळकर यांच्या नातेवाईक यांनी किती पुरावे पाठवले.  ते आर. आर.  म्हणजे वृक्षराज निंबाळकर  आहेत, रामराजे नाहीत. रामराजे निंबाळकर यांची मदत घेण्यात मला काही अडचण नाही. ते राष्ट्रवादीचे आहेत.  मी मधुदीप हॉटेलला थांबण्याचा प्रयत्न केला. पण मला तिथे रूम मिळाली नाही. असंख्य लोकांनी मला फलटणमधून माहिती पाठवली आहे. मला राजकारणात पडायचं नाही, असे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Sushma Andhare on Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजित निंबाळकरांनी माझ्या मदतीला यावं

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, पोलीस अधीक्षक तुषार दोशींना काल वेळ नव्हता. ते खांबे फार अटीट्युडवाले होते, ते म्हणत होते की. माझ्या हातात काहीही नाही. गृहमंत्र्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांना विरोधकांसाठीच वेळ नसतो. आम्हाला तेजस्विनी सातपुते नको. आम्हाला न्यायाधीशाची चौकशी समिती हवी आहे. रणजित निंबाळकरांनी माझ्या मदतीला यावं आणि 6 लोकांवर गुन्हा दाखल करावा, असे देखील त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ranjeetsinh Nimbalkar : महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली अन् दुग्धाभिषेक केला; फलटण प्रकरणात आरोप झालेल्या रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर

आणखी वाचा

Comments are closed.