निवडणूक आयोगाला काहीच ऐकायचे नाही आणि कारवाई करायची नाही; अरविंद सावंत यांचा संताप
मतदार यादीतील घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी आणि मनेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. यावेळी नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही दिले आहे. मतदार यादीत अनेक त्रुटी असून अनेक बोगस नावे त्यात आहेत. त्यामुळे मतदार यादीत सुधारणा झाल्यानंतरच निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना कोणतीच गोष्ट ऐकायची नाही आणि कोणतीच कारवाई करायची नाही, हेच दिसून येते, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला. अरविंद सावंत यांच्यासोबत या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अनिल देसाई, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्य आणि केंद्रीय मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळ आणि घोटाळा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. बोगास, दुबार मतदार याची त्यांना माहिती दिली. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वोटचोरी आणि मतदान यादीतील घोटाळा प्रझेंन्टेशनद्वारे उघड केला आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. त्यांच्याकडे गेल्यावर ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी जी यादी वापरण्यात आली, तीच आता वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार यादीतील त्रुटी दाखवल्यावरही त्यांनी दुर्लक्ष केले. यावरून त्यांना कोणतीही गोष्ट ऐकायची नाही आणि कोणतीच कारवाई करायची नाही, हे दिसून येत आहे, अेसे अवरविंद सावंत म्हणाले.
आधी त्यांनी दोनच जणांना भेटण्याची तयारी दाखवली होती. लोकशाहीत फक्त दोनच जणांना भेटण्याची परवानगी असे का? याबाबतचे पत्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षरीचे आहे. म्हणजे पक्षाचे आता तर आता आम्ही सर्व शिष्टमंडळ भेटणार, अशी भूमिका आम्ही घेतली. मात्र, अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांचा कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. ते फक्त चालढकल करत होते. अनेक पळवाटा काढत होते. खऱ्या मतदारांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे. कोणालाही नाही, असे आम्ही खडसावले. देशातील लोकशाही कशी धोक्यात आहे, हे यातून दिसून येत, असे अरविंद सावंत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत सुमारे 73 लाख मतदारांना मतदान केले. त्याचे व्हिडीओ पुरावे देण्यासही त्यांनी तयारी दाखवली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात संध्याकाळी 5 वाजेनंतर मतदान झाले तर कोणत्याही केंद्रावर गर्दी का दिसली नाही. याचे सीसीटीव्ही फुटेज का देण्यात येत नाही? असा सवालही सावंत यांनी केला. तसेच व्हीव्हीपॅटही ते वापरणार नाही? असा सवालही त्यांनी केला. त्यांची एवढी लपवाछपवी, घोळ, गोंधळ का सुरू आहे. ईव्हीएमबाबतचा प्रश्न सुरुवातीला भाजपनेच उपस्थित केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
मतदार यादीतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत मतदार याद्या दोषपूर्ण आहेत, तोपर्यंत निवडणुका घेण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी दूर कराव्या, यादीतील बोगस नावे हटवावी, योग्य मतदारांनी नावे यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी माहितीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अनिल देसाई यांनी दिला. अशा दोषपूर्ण मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणीही केल्याचे देसाई यांनी सांगितले.
Comments are closed.