भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढचा सामना कधी आणि कुठे खेळला जाणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रिमिंगची संपूर्ण माहिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेनंतर आता टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचपैकी तीन सामने पार पडले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना गुरुवार, (6 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात होईल. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडिया हा चौथा टी20 सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घ्यायचा प्रयत्न करेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना गुरुवार, (6 नोव्हेंबर) रोजी गोल्ड कोस्ट येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी म्हणजेच सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील पहिले तीनही सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. त्याचप्रमाणे चौथा टी20 सामना देखील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. यासोबतच हा सामना डीडी स्पोर्ट्सवरदेखील प्रसारित केला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (6 नोव्हेंबर) रोजी खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर पाहता येईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना (29 ऑक्टोबर) रोजी खेळवण्यात आला होता, पण पावसामुळे तो सामना रद्द झाला. दुसरा टी20 सामना लो-स्कोरिंग झाला आणि त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून विजय मिळवला, त्यामुळे त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तिसरा टी20 सामना (2 नोव्हेंबर) रोजी होबार्ट येथे खेळला गेला, जो भारतीय संघाने 5 गडी राखून जिंकला. तीन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरतील.
Comments are closed.