1000 रुपये मॅच फी ते वर्ल्ड चॅम्पियन होण्यापर्यंतचा भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रवास
पण भारतातील महिला क्रिकेटची आर्थिक स्थिती एकेकाळी अतिशय धक्कादायक होती. भारतीय महिला क्रिकेटपटूंचा सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. एक काळ असा होता जेव्हा हा खेळ जिवंत ठेवण्याचे कारण पैसा नसून आवड होती.
2005 एकदिवसीय विश्वचषक, जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघ प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यावेळी खेळाडूंना सामना खेळण्यासाठी फक्त 1000 रुपये फी मिळायची. भारताची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी महिला फलंदाज मिताली राज हिने याचा खुलासा केला आहे.
Comments are closed.