गोपीचंद हिंदुजा यांचे निधन, लंडन येथे घेतला अखेरचा श्वास

हिंदूजा ग्रूपचे अध्यक्ष गोपीचंद पी.हिंदुजा यांचे मंगळवारी लंडन येथे एका रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे.
औद्योगिक क्षेत्रात त्यांना जीपी नावाने ओळखले जात होते. ते काही आठवड्यांपासून लंडनमधील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा संजय आणि धीरज तर मुलगी रीता आहे. गोपीचंद हिंदुजा गेली सात वर्षे लंडनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, बँकिंग आणि वित्त, पायाभूत सुविधा आणि मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा ग्रुपचे वर्चस्व आहे.

Comments are closed.