Mumbai News – मुंबईत हायफाय सोसाटीतील फ्लॅटमध्ये आढळला मोलकरणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू

घरकाम करणाऱ्या तरुणीने घरमालकाच्या घरातच गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मयत 27 वर्षीय तरुणी मूळची दार्जिलिंगची असून मुंबईत कामानिमित्त राहत होती. अँटॉप हिल मोनोरेल स्टेशनजवळील आशियाना को-ऑप. सोसायटीतील बी-14 या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये तरुणी घरकाम करत होती. ज्या घरात ती काम करत होती तेथेच राहत होती. मंगळवारी सकाळी तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तरुणीच्या मृत्यूची नोंद करत याबाबत सखोल तपास सुरू आहे.

Comments are closed.