IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा कधी? कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता दक्षिण आफ्रिका भारत (IND vs SA) दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र 4 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही, त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता आहे की नेमकं कसोटी टीमचं नाव कधी जाहीर होणार?
तसंच, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या टीममध्ये बदल होणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे.

सध्या रणजी ट्रॉफी 2025-26 (Ranji trophy 2025- 26) स्पर्धेत सर्व संघ तिसरे सामने खेळत आहेत आणि आज हे सर्व सामने संपले आहेत. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयचे निवडकर्ते हे सामने संपेपर्यंत थांबले होते, त्यामुळे पुढील 72 तासांत भारताचा कसोटी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे वनडे आणि टी-20 मालिकांसाठीचा संघ नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.

भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) सध्या ऑस्ट्रेलियात आहेत, जिथे ते कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासोबत चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार आहेत.

ऋषभ पंतचं (Rishbh Pant) नारायण जगदीशनच्या जागी पुनरागमन जवळपास निश्चित आहे. तर मोहम्मद शमीचा प्रसिद्ध कृष्णाच्या जागी समावेश होऊ शकतो. शमीने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे.

भारताचा संभाव्य संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी: 14 ते 18 नोव्हेंबर – ईडन गार्डन्स, कोलकाता

दुसरी कसोटी: 22 ते 26 नोव्हेंबर – बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

Comments are closed.