भारताच्या विजयानंतरही या खेळाडूला मिळालं नाही मेडल,जाणून घ्या यामागचं कारण काय?

टीम इंडियाने महिला विश्वकप 2025 जिंकून इतिहास रचला आहे. संपूर्ण जगभर भारतीय खेळाडूंची चर्चा सुरू आहे. विश्वकप जिंकल्यानंतर केवळ पुरस्कार रक्कमच नाही, तर सर्व खेळाडूंना विजेतेपदाचे मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. पण, टीम इंडियातील एका खेळाडूला विजेतेपदाचे मेडल देण्यात आले नाही? असं का झालं, ते आपण जाणून घेऊया.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकल्यानंतर त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सर्व खेळाडूंना विजेतेपदाची पदक देण्यात आले, पण एका खेळाडूला मात्र मेडल मिळाले नाही. ती खेळाडू म्हणजे अन्य कोणी नसून प्रतिका रावल आहेत. प्रतिकाने या विश्वचषकात एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत एकूण 308 धावा केल्या होत्या. मग तरीसुद्धा तिला मेडल का देण्यात आले नाही?

यामागचे कारण आहे आयसीसीची नियम प्रणाली. प्रतिका रावल सेमीफायनलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली होत्या. तिच्या जागी शेफाली वर्मा हिला संघात समाविष्ट करण्यात आले होते. आयसीसीच्या नियमांनुसार, पुरस्कार समारंभात विजेतेपदाचे मेडल फक्त अंतिम संघात असलेल्या खेळाडूंनाच दिले जाते. आणि याच कारणामुळे प्रतिका रावलला मेडल देण्यात आले नाही.

टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच हा किताब जिंकला. प्रतिका रावल जरी दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडली होती, तरी टीम इंडियाने विजयाच्या क्षणी आपल्या सहकाऱ्याला विसरले नाही. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान प्रतिका रावल संघासोबत बसलेली दिसली. आणि जेव्हा टीम इंडियाने विश्वचषक ट्रॉफी जिंकली, तेव्हा सेलिब्रेशनच्या वेळीही प्रतिका आपल्या सहकाऱ्यांसोबत होती. व्हीलचेयरवरून उभी राहून तिने आपल्या टीमसोबत भांगडाही केला.

Comments are closed.