ICC ची मोठी कारवाई! पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी, तर बुमराहासह सूर्यकुमारला दंड


हरिस रौफवर आयसीसीची कारवाई 2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन सामने खेळवले होते. हे तिन्ही सामने वाद विवादामुळे चर्चेत राहिले. दोन्ही देशांच्या बोर्डांनी एकमेकांच्या खेळाडूंविरुद्ध आयसीसीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, आता दोन महिन्यांहून अधिक काळानंतर, आयसीसीने अधिकृतपणे खेळाडूंच्या शिक्षेची आणि त्यांना दोषी आढळलेल्या नियमांची घोषणा केली आहे. पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला 14 आणि 28 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यांसाठी शिक्षा देण्यात आली आहे. हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे, तर भारताच्या सूर्यकुमार यादवला सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्यांदरम्यान घडलेल्या घटनांनंतर आयसीसीच्या एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या सदस्यांनी ही सुनावणी घेतली आहे. सूर्यकुमारला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल आहे. जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. तर हरिस रौफलादोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले

दुबईतील सुपर 4 च्या सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुक चालवल्याप्रमाणे  सेलिब्रेशन केल्याबद्दल साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला एका डिमेरिट पॉइंटसह अधिकृत इशारा देण्यात आला. सुपर 4 च्या सामन्यात भारताच्या विजयानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या हावभावाबद्दल अर्शदीप सिंगला कलम 2 च्या कथित उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले नाही.

महत्वाच्या बातम्या:

Pak Squad vs SA Test Series : भारताविरुद्ध नको ते कृत्य करणारा हारिस रौफला संघातून डच्चू, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.