रिंकू लग्न कधी आहे? शाहरुख खाननं विचारला असा प्रश्न की प्रिया सरोजही लाजली!

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी आपला 60वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी शाहरुख खानला देश-विदेशातून असंख्य शुभेच्छा मिळाल्या. इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व खेळाडूंनीही शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यात रिंकू सिंगचाही समावेश होता. रिंकूने सोशल मीडियावर शाहरुख खानच्या फोटोंचा कोलाज शेअर केला आणि लिहिले, “सर्वात उत्तम! वाढदिवसाच्या शुभेच्छा, शाहरुख खान सर.”

जरी शाहरुखने 2 नोव्हेंबर रोजी रिंकू सिंगला उत्तर दिले नाही, तरी दोन दिवसांनी त्याने रिंकूला टॅग केले आणि लिहिले, “धन्यवाद रिंकू, खूप खूप प्रेम, लग्न कधी आहे?” शाहरुख खानने रिंकूला दिलेले हे उत्तर आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रिंकू सिंगने प्रिया सरोजशी साखरपुडा केलं आहे. रिंकूने या वर्षी ८ जून रोजी लखनऊमध्ये प्रिया साखरपुडा उरकला. तथापि, रिंकू आणि प्रियाच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्रिया एक राजकारणी आहे. प्रिया ही उत्तर प्रदेशातील मच्छली शहरची खासदार आहे. रिंकू सिंगशी तिचा साखरपुडा झाल्यापासून प्रिया सरोजच्या लग्नाची बरीच चर्चा आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. रिंकू सिंग या संघाकडून खेळतो. 2023 मध्ये, जेव्हा रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्ध यश दयालच्या एका षटकात पाच षटकार मारले तेव्हा शाहरुख प्रभावित झाला. शाहरुखने रिंकूला फोन करून विचारले की तो लग्न कधी करणार आहे.

रिंकूने एका मुलाखतीत खुलासा केला की शाहरुख खानने त्याला फोनवर सांगितले होते की तो त्याच्या लग्नात नक्कीच येऊन नाचेल. शाहरुख खानने लग्नात नाचण्याचे वचन दिले आहे. म्हणूनच किंग खानने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रिंकूला लग्नाबद्दल विचारले.

Comments are closed.