ओडीसी नृत्य अन् रशियन बॅलेटचा संगम

मुंबईकरांना येत्या शनिवारी सायंकाळी 7ः30 वाजता वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात एका अद्वितीय कलानुभवाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीची नजाकत आणि रशियन बॅलेटची भव्यता यांचा संगम घडवणारा ‘हंसिका’ हा विशेष कार्यक्रम संजली सेंटर फॉर ओडिसी डान्स, बंगळुरूतर्फे सादर करण्यात येणार आहे. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका शर्मिला मुखर्जी यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले असून संगीत दिग्दर्शन व रचना प्रवीण डी. राव यांनी केली आहे. रशियन बॅलेट आणि ओडिसी या दोन वेगळ्या परंपरा असूनही त्यांच्या सौंदर्यात आणि भावनांमध्ये एक समान धागा आहे. या दोन कला परंपरा एकमेकीशी संवाद साधू शकतात आणि परस्परांना पूरक ठरू शकतात.मुंबईत ‘हंसिका’ सादर करण्याचे माझे स्वप्न साकार होत आहे, असे शर्मिला मुखर्जी म्हणाल्या.

Comments are closed.