मतपत्रिकेवर उमेदवाराचे दुबार नाव, न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक चर्चेत

हिंदुस्थानात मतदार यादीतील घोटाळ्यावरून वातावरण ढवळून निघाले असताना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. तेथील मतपत्रिकेवर डेमॉक्रॅट्स पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांचे नाव दोन वेळा छापल्याचे आढळून आले आहे.

टेस्लाचे संस्थापक व अब्जाधीश उद्योजक एलन मस्क यांनी ही बाब निदर्शनास आणली. हे मोठे षड्यंत्र असून लोकशाहीसाठी धोका आहे, असे ते म्हणाले. मात्र, मस्क यांच्या या ट्विटनंतर त्यांनाच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मतपत्रिकेवर दोनदा नाव असणे हा घोटाळा नसल्याचे नेटकऱ्यांनी सुनावले.

फ्यूजन मतदान प्रणाली

न्यूयॉर्कमध्ये फ्यूजन वोटिंग पद्धत आहे. यात एका उमेदवाराला वेगवेगळ्या पक्षांचे समर्थन असेल तर त्या-त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्याचे नाव मतपत्रिकेवर दिसू शकते. उदाहरणार्थ, डेमॉव्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला वार्ंकग फॅमिलीज पार्टीचा पाठिंबा असेल तर दोन्ही पक्षाच्या रकान्यात त्या उमेदवाराचे नाव असते. मत पुठल्याही पक्षाच्या रकान्यात पडलेले असो, ते संबंधित उमेदवारालाच मिळते.

हिंदुस्थानी वंशाचे अनेक उमेदवार रिंगणात

अमेरिकेत वेगवेगळ्या शहरांच्या महापौरपदासाठी निवडणूक होत असून हिंदुस्थानी वंशाचे अनेक उमेदवार नशीब अजमावत आहेत. न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी निवडणूक लढत आहेत. व्हर्जिनियाच्या उपराज्यपाल पदासाठी गजाला हाशमी स्पर्धेत आहेत. सिनसिनाटीच्या महापौरपदासाठी आफताब पुरवाल आणि मॉरिसविलेच्या महापौरपदासाठी सतीश गरिमेला रिंगणात आहेत.

Comments are closed.