ICC ने महिला विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ केला जाहीर; लॉरा कर्णधार, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, हरम
आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंट: भारताच्या महिला संघाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक (Womens World Cup 2025) जिंकून इतिहास रचला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेतील टीम ऑफ द टूर्नामेंट जाहीर (ICC Team Of The Tournament) केली आहे. यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये सलामीवीर स्मृती मानधना, अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणि फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश आहे. भारताच्या या तिन्ही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करून भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) मात्र आयसीसीने टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान दिलेलं नाहीय.
स्मृती मानधनाची शानदार फलंदाजी- (ICC Team Of The Tournament)
स्मृती मानधनाने विश्वचषकाच्या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली. स्मृती मानधनाने 54.25 च्या सरासरीने 434 धावा केल्या, तसेच एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिच्या 109 धावांच्या शतकाने भारताच्या विजयाचा पाया रचला. स्मृती मानधनाच्या सातत्यपूर्ण आणि शांत स्वभावामुळे संपूर्ण स्पर्धेत संघाला चांगली सुरुवात मिळाली, ज्यामुळे तिला आयसीसीच्या सर्वोत्तम संघात स्थान मिळाले.
दीप्ती शर्माचाही समाविष्ट करणे- (दीप्ती शर्मा आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंट)
टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची कामगिरी विश्वचषकाच्या इतिहासात लक्षात राहील. दीप्ती शर्माने फलंदाजीद्वारे 215 धावा केल्या आणि गोलंदाजीत 22 विकेट्स पटकावल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने 58 धावा आणि 5 विकेट्स घेऊन सामना भारताच्या बाजूने फिरवला. या कामगिरीमुळे दीप्ती शर्माला “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरवण्यात आले आणि आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम संघात तिचा समावेश झाला.
जेमिमाह रॉड्रिग्जचे स्थान – (जेमिमाह रॉड्रिग्ज)
मध्यम क्रमातील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने स्पर्धेत 292 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने नाबाद 127 धावा केल्या आणि टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची गुरुकिल्ली ठरली. जेमिमाच्या शांत स्वभावाचे आणि अचूक शॉट निवडीचे सर्वत्र कौतुक झाले. तिच्या शानदार फलंदाजीमुळे तिला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम संघात स्थान मिळाले.
लॉरा वोल्वार्ड्टची कर्णधार म्हणून निवड- (Laura Wolvaardt)
571 धावांसह विक्रम मोडणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिची आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम संघात कर्णधार म्हणून निवड झाली. तिच्यासोबत दक्षिण अफ्रिकेच्या मॅरिझाने काप आणि नॅडिन डी क्लार्क यांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर, अॅनाबेल सदरलँड आणि एलाना किंग यांची निवड झाली. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, पाकिस्तानची यष्टिरक्षक सिद्रा नवाज आणि 12 वी खेळाडू म्हणून आलेली नॅट सायव्हर-ब्रंट यांचाही संघात समावेश आहे.
आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंट
1. स्मृती मानधना (भारत)
2. लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार) (दक्षिण आफ्रिका)
3. जेमिमा रॉड्रिग्ज (भारत)
4. मॅरिझाने काप (दक्षिण आफ्रिका)
5. अॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
६. दीप्ती शर्मा (भारत)
7. अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)
8. नॅडिन डी क्लार्क (दक्षिण आफ्रिका)
9. सिद्रा नवाज (यष्टिररक्षक) (पाकिस्तान)
10. अलाना किंग (ऑस्ट्रेलिया)
11. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
12 वी खेळाडू: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
खेळ बदलणारे आणि इतिहास घडवणारे येथे #CWC25 🙌
अधिक 📲 https://t.co/H9FioSZkSI pic.twitter.com/lZDmeerhPR
— ICC क्रिकेट विश्वचषक (@cricketworldcup) 4 नोव्हेंबर 2025
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.