सामूहिक बलात्काराच्या आरोपीला अटक

कोइम्बतूरमधून पलायनाच्या होते तयारीत : पोलिसांसोबत चकमक

वृत्तसंस्था/ कोइम्बतूर

तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक  बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तिन्ही आरोपींना चकमकीनंतर अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनंतर आरोपी वेल्लिकिनारू येथे एका निर्जन ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रात्री उशिरा तिन्ही आरोपींना वेढले होते. तिन्ही आरोपींनी पलायनाचा प्रयत्न करत पोलीस पथकावर हल्ला केला होता. यात एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिन्ही आरोपीच्या पायाला गोळी लागली. या आरोपींवर कोइम्बतूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना रविवारी रात्री घडली होती. पीडित विद्यार्थिनी कोइम्बतूर विमानतळानजीक एका मित्रासोबत कारमध्ये बसली होती. तेव्हाच तेथे अन्य गाडीतून आलेल्या 3 जणांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. आरोपींनी कारच्या खिडकीची काच तोडत पीडितेच्या मित्रावर धारदार अस्त्राने हल्ला केला, ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. यानंतर तिन्ही आरोपींनी विद्यार्थिनीचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि मग तिला तेथेच सोडून पळ काढला होता.

पीडितेचा मित्र शुद्धीत आल्यावर त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. रात्री उशिरा पोलिसांनी विद्यार्थिनीला स्थानिक लोकांच्या मदतीने शोधून रुग्णालयात दाखल केले होते. गुना, सतीश आणि कार्तिक अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

द्रमुक सरकार विरोधात आक्रोश

तामिळनाडूत सामूहिक बलात्काराच्या या घटनेमुळे आक्रोश निर्माण झाला आहे. सत्तारुढ द्रमुक विरोधात आक्रोशाचे वातावरण असून विविध राजकीय पक्षांनी दोषींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष वनथी श्रीनिवसन यांनी मंगळवारी घटनास्थळाचा दौरा करत परिसराला शहरापासून दूर निर्जन ठरविणाऱ्या पोलिसांवर टीका केली आहे. हा अत्यंत दुर्गम भाग असल्याचा दावा पोलीस करत आहेत, परंतु हा भाग शहराचाच हिस्सा आहे. आसपास नागरी वस्ती असून ती असामाजिक कारवायांचा अ•ा ठरली असल्याचा आरोप श्रीनिवासन यांनी केला.

Comments are closed.