महामंदीचा इशारा…अन् जागितक शेअर बाजार कोसळला; Nasdaq 500 तर निक्केईत 1800 अंकांची घसरण

देशाच्या शेअर बाजाराला बुधवारी गुरुनानक जयंतीनिमित्त सुटी आहे. मात्र, मंगळवारी अमेरिकेपासून आशियाई बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यातच काही तज्ज्ञांनी महामंदी येणार असल्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार कोसळला. त्याचा परिणाम सर्व देशातील शेअर बाजारावर दिसत आहे. या इशाऱ्यामुळे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज (S&P 500) आणि नॅस्डॅक इंडेक्समध्ये घबराटीमुळे मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या परिणाम गुरुवारी हिंदुस्थानी बाजारात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जागतिक बाजारपेठेत महामंदीचे भाकीत शएअर बाजारासाठी मोठे संकट ठरले आहे. या इशाऱ्याचा इतका परिणाम झाला की सर्व अमेरिकन बाजार निर्देशांक लाल रंगात गेले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 251.44 अंकांनी घसरून 47,085.24 वर बंद झाला, तर नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स 486 अंकांनी घसरून 23,348 वर बंद झाला. एस अँड पी 500 इंडेक्समध्येही लक्षणीय घट झाली, 80 अंकांनी घसरून 6,771 वर बंद झाला.
वॉल स्ट्रीट दिग्गज मॉर्गन स्टॅनली आणि गोल्डमन सॅक्सच्या सीईओंनी एक इशारा दिला की, जागतिक शेअर बाजार तीव्र घसरणीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट असल्याचे सांगण्यात आले. प्रसिद्ध लेखल रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेकदा जागतिक मंदी येत असल्याचे म्हटले आहे. आता तज्ज्ञांनीही याबाबत इशारा दिल्याने जागतिक शेअर बाजारात घबराट पसरली आहे.
गेल्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला बँकिंग दिग्गज जेपी मॉर्गन चेस (JPM.N) चे सीईओ जेमी डायमन यांनी पुढील सहा महिन्यांपासून दोन वर्षांत अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवली आहे. गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन आणि मॉर्गन स्टॅनलीचे सीईओ टेड पिक यांनी गुंतवणूकदारांना शेअर बाजारात मोठ्या बदलाबद्दल सतर्क केले आहे. त्यांनी इशारा दिला की पुढील १२ ते २४ महिन्यांत बाजारात १०% ते २०% घसरण होऊ शकते. टेड पिक यांनी १०% ते १५% च्या संभाव्य घसरणीचा उल्लेख केला.
आशियाई बाजारपेठेतही बुधवारी अमेरिकन बाजारपेठेतील तीव्र घसरण जाणवली. जपानी निक्केई क्रॅश सर्वात मोठा ठरला. निक्केईमध्ये १,८०० अंकांची घसरण होत तो ४९,०७३ वर व्यापार करत होता. हॉंग सेंग ८२ अंकांनी घसरून २५,८७० वर व्यापार करत होता. इतर आशियाई बाजारपेठांमध्ये, दक्षिण कोरियाचा KOSPI ९० अंकांनी किंवा २.१९ टक्क्यांनी घसरून ४,०३१ वर व्यवहार करत होता. DAX (-१८३), CAC (-५०) आणि गिफ्ट निफ्टी (-३१) देखील घसरले.

Comments are closed.