Kartik Purnima : कार्तिक पौर्णिमेला मातीच्या वस्तूंची खरेदी करणे असते शुभ
आज कार्तिक पौर्णिमा (05 नोव्हेंबर 2025) आहे. कार्तिक महिना हा सर्व महिन्यांमध्ये शुभ आणि फलदायी मानला जातो. कार्तिक महिना भगवान विष्णूला अतिशय प्रिय देखील आहे. या दिवशी लोक पवित्र गंगा नदीमध्ये स्नान करतात. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजा, स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये मातीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या वस्तू खरेदी केल्याने घरात सुख, शांती नांदते आणि आर्थिक लाभ होतो. चला जाणून घेऊयात कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात.
मातीचा हत्ती –
कार्तिक पौर्णिमेला मातीचा हत्ती खरेदी केल्याने सुख, शांतीचे द्वार उघडले जातात. आर्थिक लाभ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज मातीचा हत्ती नक्की खरेदी करावा.
मातीचे भांडे –

मातीच्या भांड्याची खरेदी करणे शुभ परिणाम देणारे ठरेल. हे भांडे खरेदी करून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. त्यात पाणी ठेवा रिकामे ठेवू नका. यामुळे कुटूंबातील प्रेम वाढेल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल.
मातीची मूर्ती –

तुम्ही देवी-देवतांच्या मातीच्या मूर्ती घरी आणू शकता. यामुळे घरात समृद्धीसोबत प्रगतीचे मार्ग खुले होतील.
मातीचे दिवे –

पूजा करण्यासाठी तांब्या-पितळेच्या दिव्यांऐवजी मातीचे दिवे वापरण्यास सुरूवात करावी. कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही हे दिवे खरेदी करू शकता. असे केल्याने दुर्दैव दूर होते म्हणतात. याशिवाय घरात कधीही अन्नाची आणि पैशांची कमतरता भासत नाही.
हेही वाचा – Dev Deepawali 2025: आज देव दिवाळीनिमित्त घरात ‘या’ ठिकाणी दिवे लावणं ठरतं शुभ
Comments are closed.