मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
आशियातील अनेक शहरे उंच इमारती आणि वेगवान जीवनशैलीसाठीच प्रसिद्ध आहेत. तर काही शहरे जनतेच्या हास्य आणि शांततेसाठी ओळखली जातात. आशियातील सर्वात आनंदी शहराच्या यादीत एका हिंदुस्थानी शहराने इतर सर्व शहरांना मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे. ते शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. मुंबईने बीजिंग आणि शांघाय या शहरांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.
आनंद या भआवनेसाठी कोणतेही मोजमाप नाही. मात्र, शहरी राहणीमानात पर्यावरण, अन्न आणि जीवनशाली ही जीवनावर आणि आनंदावर परिणाम करते. एका सर्वेक्षणात आशियातील सर्वात आनंदी शहराबाबतची माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षणात संस्कृती, सुरक्षितता आणि जीवनाची गुणवत्ता यासारख्या विविध पैलूंचा समावेश होता. या यादीत मुंबईने टॉप ५ शहरांच्या यादीत इतर सर्व शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
टाइम आउटने केलेल्या एका मोठ्या सर्वेक्षणानुसार, स्वप्नांचे शहर असलेले मुंबई हे केवळ हिंदुस्थानातीलच नाही तर आशियातील सर्वात आनंदी शहर असल्याचे म्हटले आहे. 94 टक्के मुंबईकरांनी शहर आनंदी करत असल्याचे सर्वेक्षणात सांगितले. तर 89 % लोकांनी इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत अधिक आनंदी असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या यशामागे अनेक कारणे आहेत. मुंबईत उत्साही सामाजिक वातावरण आहे आणि उत्कृष्ट करिअर संधी आहेत. याव्यतिरिक्त, मुंबई हे आशियातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड शहरांपैकी एक आहे. त्यामुळे हे शहरातील आनंदर द्विगुणीत करते.
आनंदी शहरांच्या यादीत बीजिंग आणि शांघाय ही दोन प्रमुख चिनी केंद्रे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही शहरे आधुनिकता, सुरक्षा आणि संस्कृतीचे परिपूर्ण मिश्रण देतात. बीजिंगमधील ९३ टक्के लोकांनी सांगितले की त्यांचे शहर त्यांना आनंदी करते. सुविधा, सुरक्षित वातावरण आणि समृद्ध सांस्कृतिक जीवनामुळे या शहराने दुसरे स्थान मिळवले आहे. त्यानंतर ९२ टक्के शांघाय रहिवाशांनीही त्यांच्या शहराचे वर्णन आनंदी असे केले. दोन्ही शहरे जनरेशन-झेड पिढीसाठी आशियातील सर्वोत्तम शहरांमध्ये गणली जातात. यावरून हे स्पष्ट होते की येथील तरुणांचे भविष्य केवळ सुरक्षितच नाही तर संधींनी भरलेले आहे.
सोल, सिंगापूर आणि जपानची राजधानी टोकियो सारखी मोठी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध शहरे या यादीत मागे पडली आहेत. टोकियो हे पहिल्या 10 मध्येही स्थान मिळवू शकले नाही. या शहरांची वेगवान जीवनशैली, काम आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाचा अभाव आणि राहणीमानाचा प्रचंड खर्च ही याची मुख्य कारणे असू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
आशियातील 10 सर्वात आनंदी शहरे
मुंबई, भारत
बीजिंग, चीन
शांघाय, चीन
चियांग माई, थायलंड
हनोई, व्हिएतनाम
जकार्ता, इंडोनेशिया
हाँगकाँग
बँकॉक, थायलंड
सिंगापूर
सोल, दक्षिण कोरिया
Comments are closed.