वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात

मोनोरेल दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन ती बंद पडली. नवीन डब्यांची चाचणी सुरु असताना चेंबुर ते वडाळा मार्गावर बुधवारी सकाळी हा अपघात घडला. मोनोरेलचा पहिला डबा ट्रॅक सोडून बाहेर आला, सुदैवाने मोनोचा चालक बचावला. नवीन डब्यांच्या चाचणीदरम्यान हा प्रकार झाल्याने प्रवाश्यांमध्ये भिती पसरली आहे. मोनोचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोनोच्या सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला आहे. मोनोरेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान नवीन डब्यांची चाचणी सुरु असताना वडाळा ते चेंबुर दरम्यान बिघाड झाला. तर हा बिघाड विद्युत यंत्रणेशी संबंधित होता त्यामुळे ट्रायल थांबविण्यात आले.

Comments are closed.