दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियात मोठे बदल होणार? या दोन स्टार खेळाडूंचं पुनरागमन
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. या मालिकेत भारताची वनडे टीम थोडी बदललेली दिसणार आहे. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) अजून पूर्णपणे फिट नसल्यामुळे तो या मालिकेचा भाग असणार नाही.
अय्यरच्या जागी ऋषभ पंतला (Rishbh Pant) टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतचं एकदिवसीय संघात बर्याच काळानंतर पुनरागमन जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. सध्या तो इंडिया-ए कडून खेळत आहे आणि साउथ आफ्रिका-ए विरुद्ध त्याचा खेळ जबरदस्त झाला आहे.
यासोबतच हार्दिक पांड्या (Hardik pandya) देखील आता पूर्णपणे फिट झाला आहे आणि त्याचही वनडे टीममध्ये पुनरागमन होणार आहे. हार्दिकला एशिया कप 2025 दरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीममध्ये नव्हता. वनडे मालिकेची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून होईल, दुसरा सामना 3 डिसेंबरला आणि शेवटचा वनडे 6 डिसेंबरला खेळला जाणार आहे.
Comments are closed.