Homemade Deodorant: डार्क अंडरआर्म्समुळे त्रस्त आहात? घरच्या घरी तयार करा केमिकल फ्री डिओडोरंट

डिओडोरंटचा वापर शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे बरेच जण बाहेर जाताना डिओडोरंट वापरतात. पण बाजारातील डिओडोरंटमध्ये काही प्रमाणात रसायनं असतात, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. शिवाय बाहेरील डिओडोरंट हे महागही असतात. अशा वेळी तुम्ही शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी घरच्या घरी केमिकल फ्री डिओडोरंट बनवू शकता. यासाठी अगदी मोजकंच साहित्य लागतं, जे घरी सहज उपलब्ध असतं. ( Homemade Deodorant for Dark Underarms )

तुरटीचा वापर घरात पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पण तुरटी केवळ पाणी शुद्ध करण्यासाठीच नव्हे तर डिओडोरंट बनवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कारण त्यात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे तुरटीपासून बनवलेलं डिओडोरंट हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. शिवाय त्यासाठी खर्चही करावा लागत नाही.

हे डिओडोरंट बनवण्यासाठी थोडी तुरटी, एक कप गुलाबजल घ्या. तुरटीची पावडर बनवून गुलाबजलमध्ये विरघळून घ्या. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा. तुम्हाला हवं असल्यास सुंगंधासाठी त्यात लव्हेंडर, लेमन ऑइलचे काही थेंब घालू शकता. तुमचं होममेड नैसर्गिक डिओडोरंट तयार आहे.

हे डिओडोरंट वापरण्याआधी बॉटल हलवून घ्या. तसेच आंघोळीनंतर तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सवर हे डिओडोरंट स्प्रे करू शकता. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

हे डिओडोरंट पूणपणे केमिकल फ्री असते. यात पॅराबेन्स किंवा अॅल्युमिनियम क्षार नसतात. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. जर तुमचे अंडरआर्म्स काळे असतील तर या डिओडोरंटचा वापर केल्यावर काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

Comments are closed.