36 वर्षांच्या हरमनप्रीतचं लग्न झालंय का? डेटिंग कोणाशी? एका क्लिकवर सर्व माहिती!

आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला आणि ऐतिहासिक स्वरूपाचा मान मिळवला. पहिल्यांदा भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला, या विजयानंतर संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.  तसेच हनमनप्रीत कौरच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेटकरी सोशल मीडियावर जाणून घेत आहेत.

हरमनप्रीत कौरला तिच्या कुटुंबासह अनेकदा पाहिले जाते. पण क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणारी हरमनप्रीत कौर सध्या अविवाहित असून तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमी सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. तिने तिच्या पालक आणि बहिणीच्या पाठिंब्याने क्रिकेटमध्ये यश मिळवले आहे, शिवाय कुटुंबाने तिला लग्नासाठी कोणताही दबाव दिला नाही. 2025 च्या विश्वचषकापूर्वी हरमनप्रीतने सोशल मीडियावर लक्ष वेधणारा नवीन टॅटू गोंदवला, ज्यात तिच्या क्रिकेट प्रवासाचे भौमितिक मंडल आणि “अहं ब्रह्मास्मि” हा संस्कृत वाक्यांश आहे, म्हणजे “मी विश्व आहे”.

हरमनप्रीत कौरचा जन्म 8 मार्च 1989 रोजी पंजाबमधील मोंगा येथे झाला. 36 वर्षीय हरमनप्रीतने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 300 हून अधिक सामने खेळले आहेत. तिने भारतासाठी 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 182 टी-20 सामने खेळले असून, अनुक्रमे 200, 4409 आणि 3654 धावा केल्या आहेत.

अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा 87 धावांनी सर्वोच्च फलंदाज ठरली, तिने मानधना सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्माने 58 धावांचा मोलाचा पाठिंबा दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने 101 धावांची शतकबद्ध खेळी केली. मात्र दीप्ती शर्माने 9.3 षटकांत 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा हातभार लावला. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट मिळवली.

या ऐतिहासिक विजयाने भारतीय महिला क्रिकेटची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली असून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने देशात आणि सोशल मीडियावर प्रचंड आनंद आणि उत्साह निर्माण केला आहे.

Comments are closed.