रत्नागिरी शहरात १ हजार ९०० दुबार मतदार, मतदानासाठी द्यावे लागणार हमीपत्र

रत्नागिरी शहरात तब्बल १ हजार ९०० दुबार मतदार असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. दुबार मतदार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार असून त्या मतदानाबाबत त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.

मतदार यादीतील दुबार मतदारांचा विषय राज्यभर गाजत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या क्षेत्रात तब्बल १ हजार ९०० दुबार मतदार असल्याची आकडेवारी मतदारांच्या नावासहित निवडणूक शाखेने जाहीर केली आहे. ही १ हजार ९०० दुबार मतदारांची रत्नागिरी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर झळकली आहे.

मतदानादिवशी गोंधळ उडणार

एकाच मतदाराचे दोन प्रभागात नाव असल्याने मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मतदाराचे नाव दोन ठिकाणी असले तरी मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. याकरिता दुबार नोंद असलेल्या मतदारांकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, याचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

Comments are closed.