मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? उद्धव ठाकरेंची सावंतांवर टीका
Uddhav Thackeray on Tanaji Sawant : उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होतात, ते परदेशात असतात. शेतकरी देह सोडतोय पण देश नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? जशी धरणाला भोके पाडली होती, असा सवाल करत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात येऊन हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात येऊन हल्लाबोल केला. पॅकेज खेकड्याने फोडलं म्हणतात, आपल्यावेळी चुकून मंत्री केलं होतं असे ठाकरे म्हणाले. पिक विम्याचे पैसे वेळेत दिले नाही, तर तुमच्या ऑफिसमध्ये शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाहीत असे ठाकरे म्हणाले. शेतकरी कर्जमाफी केली नाही, तर पवारांचे नाव लावणार नाही अस अजित पवार म्हणाले होते, आता का नाव लावता? असा सवाल देखील ठाकरेंनी अजित पवारांना केला. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे पैसे द्या, शेतकरी भिकारी नाही असेही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पंचांग बघून कर्जमाफीचा मुहूर्त काढलाय
मुख्यमंत्र्यांनी पंचांग बघून मुहूर्त काढला आहे, असे म्हणत कर्जमाफीच्या मुदतीवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. 30 जूनमध्ये कर्जमाफी होणार, आताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही ? असा सवाल देखील ठाकरेंनी केला. दोन हंगामाचे कर्ज जूनमध्ये माफ करणार का ? असा सवालही त्यांनी केला. जमीन खरडून गेली त्याची मदत कुठं आहे, सत्तेच्या मस्तीत फिरत आहेत अशी टीका देखील ठाकरेंनी सरकारवर केली.
मत चोरी नाही, मत दरोडा आहे, ठाकरेंचा हल्लाबोल
मत चोरी नाही, मत दरोडा आहे. राहुल गांधींनी उदाहरण दिले आहे. एका महिलेच 22 ठिकाणी नाव दिलं आहे. ही महिला ब्राझील मधील आहे. भारतीय जनता पार्टीची दुबार नोंदणी झाली का ? एक भारतीय जनता पार्टी, दुसरी ब्राझिलियन जनता पार्टी अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं असून बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा देखील झाली. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे सांगता उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
आणखी वाचा
Comments are closed.