Raigad News – घाटातील साईट पट्टीचा अंदाज आला नाही, दुचाकी 100 फूट खाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साईट पट्टीचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट 100 फूट खाली कोसळली. या भयंकर अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंधा घाटात हा अपघात घडला आहे. मृत शिवाजी डेरे हा तरुण मुंबईहून भोर तालुक्यातील शिळींब या त्याच्या मुळ गावी दुचाकीने जात होता. वरंधा घाटात तो आला असता घाटातील साईट पट्टीचा त्याला अंदाज आला नाही आणि दुचाकीसह तो 100 फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.