मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या ठेकेदारांना सूचना

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी समस्याही जाणून घेतल्या.

राजापूर प्रांताधिकारी डॉ.जस्मीन, जीवन देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले उपस्थित होते. ज्या ठिकाणी महामार्गाचे काम थांबले आहे, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने आज भेट देवून पाहणी केली. लवकरात-लवकर काम सुरु करण्याबाबत ठेकेदारांना त्यांनी सूचना दिली. ते म्हणाले, काम गतीने करण्यासाठी नियोजन करावे. काही समस्या, अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. अधिक वेगाने काम करुन पूर्ण करण्यासाठी वेळेचेही नियोजन करा.

Comments are closed.