ट्रेंड – बिबटय़ाची झडप…

वाघ, सिंह, बिबटय़ा अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. वाघाच्या शिकारीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओतही एका बिबटय़ाने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे. एका घराबाहेर एक कुत्रा झोपला असून बिबटय़ाची नजर त्याच्यावर पडते. या वेळी बराच वेळ बिबटय़ा त्या झोपलेल्या पुत्र्याकडे एकटक पाहतो. त्यानंतर अचानक झोपलेल्या पुत्र्यावर झडप घालतो आणि त्याची शिकार करतो. भयानक असे हे दृश्य आहे. हा व्हिडीओ यूटय़ूबवरील @Himalayan Host या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास 38 मिलियनहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत.

Comments are closed.