देशभरातील सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका एअर इंडियाला बसला आहे

दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा ; चेक-इन मॅन्युअली करण्याची वेळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बुधवारी दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. दुपारी 3 वाजल्यापासून टर्मिनल 2 वर सर्व्हरची समस्या निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना बराचवेळ ताटकळत उभे रहावे लागले. या तांत्रिक सॉफ्टवेअर समस्येमुळे मॅन्युअल चेक-इन लागू करण्यात आले होते.

दिल्ली विमानतळावर अनेक प्रवाशांना दिरंगाईचा सामना करावा लागला. काही प्रवाशांनी एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये मंगळवारपासून ही समस्या येत असल्याचे स्पष्ट केले. सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे एअरलाइनने काही विमानांच्या बाबतीत मॅन्युअल चेक-इन सुरू करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, मॅन्युअल चेक-इन प्रक्रिया बरीच मंदावल्यामुळे प्रवासी कंटाळले होते.

Comments are closed.