भारत-ऑस्ट्रेलिया चौथा टी20 सामना फ्रीमध्ये कुठे आणि किती वाजता पाहाल?

IND vs AUS 4th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज, गुरुवार (6 नोव्हेंबर) रोजी क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत असून हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रोमांचक विजय मिळवत मालिकेत परतले. त्यामुळे आजचा सामना मालिकेचे चित्र बदलू शकतो.

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात खेळलेली धडाकेबाज खेळी भारतीय चाहत्यांसाठी आशादायक होती. सूर्यकुमारच्या शांत नेतृत्वाखाली युवा फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ देखील कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारा नाही. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या चांगल्या लयीत आहे. मार्कस स्टोइनिस, टिम डेविड यांसारखे पॉवर-हिटर भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतात. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होईल. टॉस दुपारी 1:15 वाजता पार पडेल. टीव्हीवर हा सामना Star Sports नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर ऑनलाइन प्रेक्षक JioCinema किंवा Hotstar च्या माध्यमातून थेट स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, ज्या प्रेक्षकांना मोफत सामना पाहायचा आहे, ते DD Sports वर हा सामना निशुल्क पाहू शकतात.

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11 – सूर्यकुमार यादव (कर्ंधर), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

Comments are closed.