हनुमान… नरेंद्र मोदींनी दीप्ती शर्माला ‘तो’ प्रश्न विचारताच हरमनप्रीत, स्मृतीसह सर्व आर्श्चयच
भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार बातम्या : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 ची ट्रॉफी (India beat South Africa first World Cup title) जिंकल्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) सर्व खेळाडूंना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या अनुभवांविषयीही गप्पा मारल्या. आता या संपूर्ण भेटीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या संवादादरम्यान पीएम मोदींनी महिला खेळाडूंना अनेक मजेशीर प्रश्न विचारले. ऑलराउंडर दीप्ती शर्माला तर असा एक प्रश्न विचारला की, तो ऐकून संपूर्ण टीम इंडिया थोडी आर्श्चयचकीत झाली. मोदींच्या शेजारी बसलेली स्मृती मानधना तर क्षणभर स्तब्धच राहिली.
विजयी भारतीय क्रिकेट संघाने भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
आम्ही माननीय पंतप्रधानांचे त्यांच्या प्रोत्साहन आणि समर्थनाच्या शब्दांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो जे सतत प्रेरणा देत आहेत #TeamIndia… pic.twitter.com/8vcO4VgPf6
— BCCI महिला (@BCCIWomen) 6 नोव्हेंबर 2025
मोदींनी विचारले, “हनुमानजी काय मदत करतात?”
पंतप्रधान मोदींनी दीप्तीला विचारले, “तुमच्या हनुमानजीच्या टॅटूमुळे तुम्हाला काय मदत होते?” या प्रश्नावर तिथे उपस्थित सर्व खेळाडूं हैराण झाल्या. स्मृती मानधनाही ते ऐकून थोडी आश्चर्यचकित झाली. यावर दीप्तीने उत्तर दिलं, “मला वाटतं, त्यांच्यामुळे मी अडचणींमधून बाहेर पडते.” यावर मोदींनी हसत विचारलं, “इंस्टाग्रामवर ‘जय श्रीराम’ पण लिहितेस का?” दीप्तीने हसत उत्तर दिलं, “हो, तसंही लिहिलं आहे.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की दीप्तीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले. तिने संपूर्ण स्पर्धेत एकूण 22 विकेट्स घेतल्या आणि 215 धावा केल्या.
टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचा प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान वाटतो. महिला क्रिकेट संघाशी संवाद साधताना खूप आनंद झाला. पहा! https://t.co/PkkfKFBNbb
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 6 नोव्हेंबर 2025
दीप्ती शर्माने पुरुष क्रिकेटपटूंनाही मागे टाकले…
2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले, तिने 215 धावा केल्या आणि 22 विकेट्स घेतल्या. यामुळे ती एकाच विश्वचषकात 200 धावा आणि 20 विकेट्स घेणारी पहिली क्रिकेटपटू (पुरुष किंवा महिला) ठरली. पुरुष असो वा महिला विश्वचषक, कोणत्याही खेळाडूने हा पराक्रम कधीही साध्य केलेला नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.