Hair Oil Tips: हेअर टाईपनुसार केसांसाठी कोणतं तेल वापरावं?
केसांची निगा राखण्यासाठी नियमितपणे केसांना तेल लावणं गरजेचं आहे. बहुतांश महिला या केसांसाठी नारळ, बदाम किंवा मोहरीचं तेल वापरतात. मात्र तुम्हाला माहित आहे का तुमच्या हेअर टाईपनुसार तुम्ही तेल लावणं केसांसाठी चांगलं असतं. केसांना कोणतेही तेल लावल्याने केस कोरडे होणं, कोंडा होणं, निस्तेज दिसणं असं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या केसांसाठी कोणतं तेल योग्य ठरतं ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ( How To Choose Hair Oil According to Hair Type )
केसांची वाढ
केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल सर्वोत्तम ठरतं. या तेलामुळे केसांची वाढ होते, टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसगळतीही थांबते. या तेलाने टाळूला हलक्या हाताने मसाज केल्यास फायदा होतो.
डॅमेज केस
तुमचे केस जर जास्त प्रमाणात डॅमेज म्हणजेच निस्तेज, कोरडे झाले असतील तर यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. बदामाचे तेल हे अशा प्रकारच्या केसांसाठी योग्य ठरतं. त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस दुरुस्त होण्यास मदत होते. या तेलामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतात.
कोरडे केस
जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही खोबरेल तेल वापरावे. यामुळे केस हायड्रेट आणि मॉइश्चरायझ राहतात. कोरडे केस असणाऱ्यांनी नियमितपणे केसांना खोबरेल तेल लावल्यास फायदा होतो.
चिकट केस
जर तुमचे केस चिकट असतील तर यासाठी जोजोबा हेअर ऑइल वापरणं चांगलं ठरतं. जोजोबा तेल चिकट नसते, ज्यामुळे केसांत तेलाचे उत्पादन नियंत्रित राहते. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होतो आणि केसांना पोषण मिळते.
निरोगी केसांसाठी
जर तुमचे केस निरोगी आणि दाट असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरणं योग्य ठरतं. त्यामुळे केसांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते आणि केस मुळांपासून मजबूत होतात.
Comments are closed.