Yoga VS Morning Walk: योग की चालणं? शरीरासाठी काय जास्त फायदेशीर?

फिट अँड फाईन राहण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याचदा लोकं शरीरासाठी योग की चालणं काय फायदेशीर असतं याबाबत संभ्रमात असतात. पण हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. असं असलं तरी त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. चालणं हे वजन कमी करण्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर योग हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आज आपण जाणून घेऊया आरोग्यासाठी योग आणि चालण्याचे फायदे नेमके काय आहेत? ( Yoga or Morning Walk what is beneficial for health ? )

सकाळी चालण्याचे फायदे (चालण्याचे फायदे)
सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे हृदयाला फायदे होतात. यामुळे रक्ताभिसरण आणि चयापचय सुधारते. मॉर्निंग वॉकमुळे स्नायू मजबूत होतात. तसेच सकाळी चालल्याने मानसिक ताण कमी होतो. शिवाय वजन कमी करण्यासाठी तुमच्या कॅलरीज बर्न होणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही नियमितपणे रोज सकाळी चालल्याने कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो.

योगाचे फायदे (योगाचे फायदे)
सकाळी योगा करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक आरोग्य सुधारते, शांत झोप लागण्यास मदत होते. योगा केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीराची लवचिकताही वाढते. तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि जर तुम्हाला श्वसनाच्या समस्या असतील तर योगामुळं त्या देखील कमी होतात.

काय जास्त फायदेशीर?
चालणं आणि योग दोन्हीचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. तथापि, जर तुम्हाला तुमच्या शरीराचे मेटाबॉलिझम वाढवायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर चालणं हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो. तसेच जर तुम्ही चिंता, डिप्रेशनने त्रस्त असाल तर योगा केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते.

Comments are closed.