SA vs PAK: आफ्रिकेचा पलाटवार, पाकिस्तानचा धुव्वा उडवला, मालिका बरोबरीत!
गुरुवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या एकतर्फी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट कामगिरी करत 8 विकेटने आरामदायी विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाकिस्तानने पहिला सामना दोन विकेटने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 9 विकेट गमावून 269 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 59 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. पाकिस्तानकडून वसीम आणि फहीमने प्रत्येकी 1 विकेट घेतली, तर कर्णधार शाहीन आफ्रिदी अपयशी ठरला.
270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने डी कॉक आणि प्रिटोरियससह डावाची सुरुवात केली. दोघांनी 71 चेंडूत 81 धावांची सलामी भागीदारी केली. प्रिटोरियस 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या डावात सात चौकार आणि एक षटकार मारला. टोनी जॉर्गी 63 चेंडूत 76 धावा काढून बाद झाला, त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार मारले. यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने 119 चेंडूत 123 धावा केल्या, त्याने आठ चौकार आणि सात षटकार मारले. ब्रिट्झकेने 21 चेंडूत 17 धावा केल्या. पाकिस्तानकडून फहीम अशरफने एक बळी घेतला आणि वसीम ज्युनियरने एक बळी घेतला.
तत्पूर्वी, पहिल्या डावात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फखर झमानही धाव न घेता बाद झाला. माजी कर्णधार बाबर आझमही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही, त्याने 11 धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानने चार धावा केल्या. सॅम अयुब 53 धावा काढून बाद झाला. तलतने 10 चेंडूत 10 धावा केल्या. सलमान आघाने 105 चेंडूत 69 धावा केल्या. मोहम्मद नवाजने 59 चेंडूत 59 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने चार, पीटर्सने तीन आणि बॉशने दोन विकेट घेतल्या
Comments are closed.