मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला जाण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करत दोन्ही देशात व्यापार कराराबाबत चर्चा पुढे सरकत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले याचा पुनरुच्चारही केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तम चर्चा सुरू असून दोन्ही देशातील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ते पुढील वर्षी हिंदुस्थानचा दौरा करू शकतात, असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. वजन कमी करण्याच्या औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी नवीन कराराची घोषणा केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख महान व्यक्ती व मित्र असा केला.

Comments are closed.